अहेरी : तालुक्यातील देवलमरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नंदिगांव येथील समस्त नागरिकांनी आज आविसं – काँग्रेसचे युवा नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी जनसंपर्क कार्यालय येते भेट घेतली.भेटीदरम्यान माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कांकडालवार यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या व निरोगी आयुष्यासाठी मनोकामना केली.यावेळेस नंदीगाव येथील नागरिकांनी आपल्या समस्या अवगत करून दिले.
अजयभाऊ कांकडालवार यांनी विश्वासित करत नागरिकांशी संवाद सादला त्यावेळी अजयभाऊंनी म्हणाले”की”मी जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.नेहमी मी तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे.आणि राहणारच गडचिरोल्ली जिल्ह्यातील जनतेने मला अफाट प्रेम दिला आहे.आणि मी त्या प्रेमाचे ऋण मी नक्की तुमच्या समस्या सोडवून फेड करीन सदैव तुमचे प्रेम माझ्या वरती असू द्या असे म्हनाले.
येणाऱ्या विधानसभा निवळणुकीत आपल्या नेतृत्वाखाली उमेदवार असेल त्याला भर भरून प्रेम द्या ज्या प्रमाणे तुम्ही मला जिल्हा परिषदेवर पाठविले त्याच प्रमाणे आपल्या नेतृत्वात उभ्या असणाऱ्या उमेदवाराला विधानसभेत पाठवून त्यांना ही सेवा करण्यात संधी द्यावी.
यावेळेस नंदीगाव येथील नागरिकांनी मोठ्या आनंदाने भाऊ आम्ही आपल्या नेतृत्वात उभे असणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देऊ.विधानसभेत पाठवू.आम्ही तुमच्या रुपात विकास पाहतो.आमच्या भागातील विकासाला चालना मिळेल.आज तुमच्याशी वार्तालाब करून अति आनंद झाला अशी नागरिकांनी मत व्यक्त केले.
यावेळी हरिश गावडे उपसरपंच ग्रामपंचायत देवलमरी,संदिप दुर्गे,अविनाश गलबले,नागेश सिडाम,राहुल आलाम,आनंदराव सिडाम,प्रकाश मडावी,किशोर आलाम,स्वप्निल तोर्रेम,प्रभाकर मडावी,प्रकाश कुमरम,श्रीकांत आलाम,सुनिल सिडाम,रोहीत आलाम,खुशाल गेडाम,श्रावन मडावी,अरविंद सोयामसह आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.