सिरोंचा : तालुक्यातील मेडाराम येथील स्पॉर्टन्स क्रिकेट क्लब मेडाराम तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केली आहे.या क्रिकेट स्पर्धेचे आविसं – काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.
सदर या क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीया पारितोषिक आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम – काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जावजी यांच्या कडून.तर तृतीय पारितोषिक महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नीताताई तलांडे कडून देण्यात येत आहे.माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी गावात आगमन होतच ढोल तशाने जंगी स्वागत केली.
यावेळी आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी,आविसंचे जेष्ठ नेते शंकर मंदा,जेष्ठ नेते मल्लिकार्जुन आकुला,मेडराम ग्रामपंचायतचे माजी सरपंच वेंकान्ना तल्ला,सरपंच अजय आत्राम,सरपंच सूरज गावडे,सिरोंचा बाजार समिती संचालक नागराजू इंगली,जाफ्राबाद ग्रामपंचायतचे सरपंच बीचमाय्या कुळमेथे,मारुती गणपूरवार,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,गर्कपेठा ग्रामपंचायतचे उपसरपंच वेंकटी दसरी,माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,स्वप्नील मडावी,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवार,लक्ष्मण बोल्ले,आनंदाराव ठाकूर,प्रशांत माहुर्ले,श्रीनिवास लेंकाला,वेंकटेश लेंकाला,सरलकुमार वेल्पूला,सत्यम ठाकूर,अनाजनकुमार तल्ला,साई तल्लासह परिसरातील आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.
Home सिरोंचा माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट...