अहेरी : राजाराम पंचायत समिती गण कुरुमपली – कोळसेपली – एकरा येथे इंडिया महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ.नामदेव किरसान यांच्या निवडणुकी संदर्भात प्रचार सभा घेण्यात आली.येणाऱ्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाला मतदान करुन विजयी करावे असे आव्हान करण्यांत आली.
आविसं काँग्रेसचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ ककंडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे यांच्या नेतृत्वाखाली सभा आयोजित करण्यात आली.
सदर सभेला कुरुमपलीचे सरपंचा मैंनी तलांडे,रमेश पोरतेट,शैलेश कोंडागुर्ले,रमेश गावडे,श्रींनीवास मडावी,विजय तलांडी,बंडकृष्णा आत्राम,मंगेश तलांडी,बंडू बडगेल,रैनु आत्राम,पोरिया आत्राम,सोमा तलांडी,सुधाकर तलांडी,पांडू गावडे,मालू गावडेसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.