Home राजकीय माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी काटेपल्ली येथील डाॅ.किरसान यांच्या निवडणुकी संदर्भात प्रचार

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी काटेपल्ली येथील डाॅ.किरसान यांच्या निवडणुकी संदर्भात प्रचार

17
0

अहेरी : तालुक्यातील काटेपल्ली येते काल आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी येथील नागरिकांची भेट घेऊन होणाऱ्या लोकसभा निवडणुकी संदर्भात प्रचार करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॅा.नामदेव किरसान हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.अभ्यासू आणि उच्चशिक्षित उमेदवार अशी त्यांची प्रतिमा असून गेल्या सहा वर्षात त्यांनी सातत्याने मतदार संघात ठेवलेला जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार सांगितले की’ येणाऱ्या भविष्यात काँग्रेस पार्टी सत्तेत आल्यास आपल गाव आणि संपूर्ण जिल्हाचे विकास होऊ शकते.एप्रिल 19 तारीखेला आपण सर्वांनी काँग्रेसच्या पंजा चिन्हा समोरील बटण दाबून डॉ.नामदेव किरसान साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करा म्हणून येथील नागरिकांना सांगितले आहे.त्यावेळी नागरिकानी म्हंटले की’आम्ही सर्वांनी आपल्या उमेदवारांना जिंकून देण्यासाठी आत्माविश्वासाने काम करू असे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here