Home अहेरी मुसळधार पावसाने अंगावर घर पडले : जखमींच्या मदतीकरिता धावले कंकडालवार

मुसळधार पावसाने अंगावर घर पडले : जखमींच्या मदतीकरिता धावले कंकडालवार

61
0

 

 

अहेरी : येथील प्रभाग क्रमांक तीन मधील गोविंदलवार हे घरी असतांना मुसळधार पावसाने त्यांचे घर पडले यात दाम्पत्य जखमी झाल्याने काँग्रेसनेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी मदतीचा हात पुढे करत आर्थिक मदत केली.

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.अशातच अहेरी तालुक्यातही मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पर्जन्य परिस्थिती निर्माण झाली.अहेरी येथील प्रभाग क्रमांक तीन मधील श्री.प्रदीप बाबुराव गोविंदलवार त्यांची पत्नी वंदना प्रदीप गोविंदलवार हे घरी असताना अचानक घर पडले यात पती-पत्नी हे दबले गेले लागलीच शेजारच्यांनी धाव घेत दोघांनाही त्यातून कसेबसे बाहेर काढले.

मात्र यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आल्या.याबाबतची माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना माहीत होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती घेतली व गोविंदलवार दाम्पत्यांची रुग्णालयात भेट घेऊन हस्तेने विचारपूस करत आर्थिक मदत केली.गोविंदलवार यांचं घर पडल्याने संसार उघड्यावर आला आहे.पावसाचे दिवस असल्याने राहायची कुठे असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाला असल्याने कंकडालवार यांनी ताडपत्री सुद्धा त्यांना दिली.शिवणकाम व मोलमजुरी करून हे दाम्पत्य आपला संसार चालवत होते मात्र आता घर पडल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here