Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते इंडियन...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते इंडियन दस्तक न्यूज चॅनेल चे उदघाटन

94
0

अहेरी : आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते”इंडियन दस्तक न्यूज चॅनेल चे उदघाटन करण्यात आले.या वेळी त्यांनी आपल्या शुभ हस्ते रिबीन फित कापून शुभारंभ केला.यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले आहे”की”पत्रकारिता जनकल्याणासाठी गोर गरीब जनतेच्या समस्या शासनाच्या दरबारी पोहोचवून शोषित पीडित वंचितांचा आवाज बनून गरजला पाहिजे.लोकशाही वाचवण्यासाठी आज पर्यंतचा काळात पत्रकारितेचा खूप मोठा वाटा आहे.समोरची लोकशाही टिकवायची असेल तर पत्रकारिता ही निष्पक्ष असली पाहिजे कोणत्याही आमिषाला बडी न पळता सत्यतेकडे मार्गक्रमण केले पाहिजे.यावेळी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी इंडियन दस्तक न्यूज नेटवर्कचे संपादक सुरेशभाऊ मोतकुरवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व सदैव आम्ही आपल्या पाठीशी आहो अशी अजयभाऊंनी ग्वाही दिली.

याअहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक,प्रमोद गोडशेलवार विशाल वाडके,विणेश भोयर,अर्जून परकिवार,इंशात दाहगांवकरसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व पत्रकार बंधू उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here