अहेरी : तालुक्यातील देवलमरी येथील रहिवासी उमा गजानन बामनकर परिवाराला घर नसल्याने त्यांना हा पावसाळ्यात राहण्यासाठी अडचण भासत होती.विशेष म्हणजे बामनकर परिवार एका झाडाखाली झोपडी बांधून ताळपत्री टाकून राहत होते.मात्र या पावसाळ्यात झोपडी वरील ताळपत्री पण उडून गेले.यामुळे बामनकर कुटुंबासमोर अंत्यत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती.
देवलमरी परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी महेश लेकुर कडे येऊन त्यांनी आपली परिस्थिती सांगून घेतले.उमा बामनकर आणि त्यांच्या मुलगा समीर बामनकर यांना घेऊन महेश लेकुर यांनी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेऊन बामनकर कुटुंबाची परिस्थिती सांगितले होते.
बामनकर परिवाराची परिस्थिती जाणून घेऊन अजयभाऊ कांकडलवार यांनी त्या परिवाराला ताळपत्री तसेच तात्पुरता घर दुरुस्ती साठी आर्थिक मदत केली.या मदतीविषयी देवलमरी येथील बामनकर कुटुंबातील सदस्यांनी अजयभाऊंची आभार मानत समाधान व्यक्त केले.बामनकर कुटुंबाला मदत करतांना अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,महेश लेखूर,श्रीनिवास राऊत,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवार उपस्थित होते.