अहेरी : तालुक्यातील छाल्लेवाडा येथील जेष्ठ नागरिक बापू झाडे यांनी कॉन्सरग्रस्त असून दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यासाठी बापूला अडचण भासत होती.काल बापू झाडे काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांचा अहेरी जनसंपर्क कार्यालय येथे कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांची अवस्था सांगितले होते.
अजय कंकडालवार बापू झाडे यांचा अडचण बघून त्यांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत केले आहे.त्यावेळी अजयभाऊंनी सांगितली की पुढील कोणत्याही समस्या असो मला सांगा मदत करण्यासाठी मी तयार आहो असे कॉन्सरग्रस्त बापू झाडे यांना सांगितले.औषध उपचारासाठी आर्थिक मदत मिळल्याने बापू झाडे यांचा चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले आणि कंकडालवारांचे आभार मानले.
यावेळी मदत करतांना अजय कंकडालवार सोबत अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी सभापती सुरेखा आलम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, विलास बोरकर, गुलाब देवगडे, तिरुपती दुर्गे, राजाराम झाडे,माजी उपसरपंच कार्तिक तोगम,संजय पोरतेट मा.उपसरपंच,मुत्ता पोरतेट,शैलेश कोंडागुर्ला,प्रकाश दुर्गेसह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा कडून कॅन्सरग्रस्त वेक्तीला औषध उपचारासाठी आर्थिक मदत