Home मुख्य बातम्या आरेवडा ते हितापाडी-PMJSY-अंतर्गत केलेल्या रस्त्यांचे बाधकाम निकृष्ट दर्जेचे

आरेवडा ते हितापाडी-PMJSY-अंतर्गत केलेल्या रस्त्यांचे बाधकाम निकृष्ट दर्जेचे

58
0

भामरागड : तालुक्यातील आरेवडा ते हितापाडी मार्गचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्णत्वास झाले असून परंतू पावसाळ्यात त्या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली असल्याने रस्त्याचे डबके सुद्धा झाल्याची दिसत आहे.कारण सदर रस्त्यांवर पाहिजे त्या प्रमाने काम झालेले नसून सदर रस्ता किती दिवस ठिकाणार आहे.रस्ता शासनाच्या नियम अटी नुसार न बनवता ठेकेदार आपल्याच मनमर्जी पद्दतीने डांबरीकरण करत आहेत. मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने टाकलेली डांबर उखुडुन जात असून सदर रस्ता वाहतूक केल्यावर भेगा पडत आहेत.या कामांची मेंटनन्स 5 वर्षीची असून सुद्धा आता पर्यंत त्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेला नाही.तरी संबंधित विभागणी लक्ष देऊन कारवाई करण्यात यावी.संमंधित कात्राटदारांना चौकशी करण्यात यावी म्हणून नागरिकांनी वारंवार निवेदन देण्यात आली.मात्र अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करण्यात आली.

आज “या”नागरिकांनी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना नागरिकांनी संबंधित कात्राटदारांना कारवाई करण्यात यावी म्हणून नागरिकांनी अजयभाऊंना निवेदन देऊन मागणी केली आहे.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,राकेश सडमेक,नरेश गर्गम,ग्रामसभा हितापाडी गावातील रैनू नरगो पुगाटी,कार्वे नरगो पंगाटी,देवाजी महारू पंगाटी,सोमजी देवू पूगाटी,भीमा नरगो पुगाटी,रैनू पुसू पुंगाटी,जुरू दसरू पुंगाटी,किशोर डुरा परसा,रामा गोंगलु पुंगाटी,पांडू गोंगलु पुंगाटी,राजू कुमा परसा,प्रमोद गोडसेलवार,प्रकाश दुर्गेसह गावातील नागरिक तसेच आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here