Home मुख्य बातम्या माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व हणमंतू मडावी यांचा हस्ते बहीण लाडाची,वाहिनी काळाची...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व हणमंतू मडावी यांचा हस्ते बहीण लाडाची,वाहिनी काळाची दंडार आरक्रेस्टार कार्यक्रमाची उदघाटन

23
0

अहेरी : विधानसभा क्षेत्रातील या वर्षी नवरात्री उत्सव मोठ्या थाटात संपन्न होत आहे.मुलचेरा तालुक्यातील मोहर्ले येथील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शरदा मातेच्या प्रतिष्ठापना करण्यात आली.नवरात्री उत्सव दरम्यान प्रत्येक मंडळा ठिकाणी दांडिया,दांडर,संगीतसह अनेक कार्यक्रम आयोजित केले जाते.मोहर्ले मंडळाचे पदाधिकारी सदस्यांनी अजय कंकडालवार व हणमंतू मडावी यांची भेट घेऊन आपला मंडळ ठिकाणी दंडार आरक्रेस्टार कार्यक्रम ठेवण्यात यावी म्हणून विनंती केले आहे.

काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी मंडळाच्या विनंतीला मन ठेवून मोहर्ले मंडळ ठिकाणी दंडार हा नावाच्या कार्यक्रम आयोजित केले आहे.

सदर मंडळ ठिकाणी दंडार आरक्रेस्टार कार्यक्रमची उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार तसेच आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मडावी यांचा हस्ते काल उदघाटन करण्यात आली आहे.दरम्यान कंकडालवार व मडावी यांनी शरदा मातेची विधिवात पूजा अर्चना,आरती देऊन मातेची दर्शन घेतले.त्यावेळी अजय कंकडालवार यांनी शरदा मातेची चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केले.

यावेळी गीता चालुरकर माजी उपसभापती अहेरी,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,कमलेश सरकार,रॉबीन मंडल,दास काका,अज्जू पठाण माजी सरपंच आलापल्ली,चंदू बेजलावार प्रतिष्ठित नागरिक आलापल्ली,स्वप्नील मडावी,रिंकू मडावी,सरदार माट्टा,चिंटू मडावी,प्रमोद गोडसेलवार,सचिन पांचार्या,रवी भाऊ भोयरसह परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here