Home सामाजिक माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते वेलगूर येथील माता मंदिराचे लोकार्पण

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते वेलगूर येथील माता मंदिराचे लोकार्पण

18
0

अहेरी :  तालुक्यातील वेलगूर येथे माता मंदिर नसल्यामुळे गावांतील प्रत्येक प्रवर्गातील समाज बांधवाना उत्साहात कार्यक्रम घेण्यासाठी अडचन भासत होते.प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रम असेल,सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल सर्व प्रथम माता मंदिरत जावून पूजा अर्चना करून बाकीचे कार्यक्रम पार पाडत होते.माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी वेलगूर येथील दौऱ्यावर गेले होते.

                  दौऱ्यावेळी गावातील सर्व नागरिक माता मंदिर नसल्यामुळे कशा प्रकारचे अडचण भसत होते सांगितले.गावातील नागरिकांची समस्या जाणून घेऊन यांनी शासन कडून आताचे आता माता मंदिर साठी निधी उपलब्ध होत नाही.मात्र मी स्वखर्चाने माता मंदिर बांधून देतो अशी ग्वाही दिले.

                सदर बांधकाम ही पूर्ण झाले असल्याने.आदिवासी विध्यार्थी संघ,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते विविध पूजा अर्चना करून रीतसर उदघाटन करण्यात आले.

                 त्यावेळी नागरिक अजयभाऊ कंकडालवार यांना आभार म्हणले.त्यावेळी सहउदघाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतु मडावी होते.

         यावेळी गीताताई चालूरकर माजी सभापती पंचायत समिती अहेरी,किशोर आत्राम सरपंच ग्रामपंचायत वेलगूर,उमेश मोहुर्ले उपसरपंच ग्रामपंचायत वेलगूर,रोहित गलबले सदस्य ग्रामपंचायत वेलगूर,अशोक येलमुले उपसरपंच ग्रामपंचायत किष्टापूर ,आशांना दुधी माजी सरपंच वेलगूर,अज्जू पठाण माजी सरपंच आलापली,नरेश गर्गम,आनंदराव मराठे,शंकर झाडे,केशर गलबले,रवी टेकाम ,दीपक चुनारकर,शामराव चौधरी,रवी गाऊत्रे,मारोती बावणे प्रमोद गोडशेवारसह आदी उपस्थित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here