Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून अस्वलीच्या हल्यात जखमी झालेल्या इसमास आर्थिक...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून अस्वलीच्या हल्यात जखमी झालेल्या इसमास आर्थिक मदत

58
0

अहेरी : तालुक्यातील मरपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या करंचा येथील अस्वलीच्या हल्यात जखमी झालेले शंकर लिंगा सिडाम यांचे उपचार नागपूर येथे सुरू असून त्यांच्या उपचाराकरिता आर्थिक मदत भासत होती हि बाब मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच हनमंतू मुरारी कोरेत यांनी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना कळवताच अजयभाऊ कंकडालवार यांनी क्षणाचाही विलंब न करता माजी सरपंच हनमंतू कोरेत यांच्या कडे आर्थिक मदत देऊन नागपूर रुग्णालयात पाठवून तब्येतीची काळजी घ्या व काही मदत लागल्यास कळवा असे बोलले.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,नरेंद्र गर्गम,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडशेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here