Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जाणुन घेतल्या महीला ग्राम संघाच्या महिलांच्या विविध...

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जाणुन घेतल्या महीला ग्राम संघाच्या महिलांच्या विविध समस्या

27
0

अहेरी : तालुक्यातील देवलमरी येथील महिला ग्राम संघाच्या महिला मंडळाशी आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट घेऊन विविध समस्यावर चर्चा करण्यात आली आहे.

चर्चे दरम्यान महिलांच्या विविध अडचणी राष्ट्रीयकृत बँक,विजेची समस्या,घरकुल योजना,पाणीची समस्यासह अनेक प्रकारच्या समस्या महिलांनी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या समोर मांडण्यात आली आहे.अजयभाऊ कंकडालवार यांनी महिलांच्या अडचणी जाणून घेऊन अडचणी सोडवण्याचा आश्वासन दिले.त्यावेळी महिला ग्राम संघ देवलमरी परिसरातील महिला भागनींनी समाधान व्यक्त केले.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतूजी मडावी, देवलमरीचे माजी सरपंच पेंटूबाई पोरतेट, ग्रामपंचायत देवलमरीचे उपसरपंच हरीश गावडे , ग्राम पंचायत सदस्य विद्याताई राऊत,ग्रामपंचायत सदस्य संजूबाई आत्राम,ग्रामपंचायत सदस्य विमलाताई कुर्री, ग्राम पंचायत सदस्य महेश लेकुर,सामाजिक कार्यकर्ते रज्जाक पठाण, माजी ग्राप सरपंच गुलाबराव सोयाम, वांगेपलीचे सरपंच दिलीप मडावी, माजी ग्राप सदस्य अरूण मज्जरवार,मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेक,नरेंद्र गर्गम, लक्ष्मण आत्राम,श्रीनिवास राऊत,संतोष परसा, सुधाकर लेकुर,शंकर आत्राम,सुधीर बामणकर,सदाशिव बामणकर,नागेश राऊत,संजय गोंडेवार,रमेश मेशिन,संदीप दुर्गे, सचिन पांचार्यासह परिसरातील महिला बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here