Home मुख्य बातम्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील युवक- युवतीना प्रकल्पात कायम रोजगार उपलब्ध करून द्या तसेच...

अहेरी विधानसभा क्षेत्रातील युवक- युवतीना प्रकल्पात कायम रोजगार उपलब्ध करून द्या तसेच स्थानिकांना प्रथम प्राधान्य द्यावे

42
0

गडचिरोली : येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय चंद्रपूर द्वारा आयोजित मे.लॉयड्स मेटल्स अन्ड एनर्जी लिमिटेड द्वारा आयोजित जनसुनावणीत माजी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी प्रकल्पाबद्दल आपले म्हणणे मांडत त्यांनी एटापल्ली तालुक्यातील मौजा नागुलवाडी,महूर्ली,कारमपल्ली,एकरा खुर्द,झारेवाडा,मरकल,रेकानार,पेठा,आलदंडी,पुरसलगुंदी,परसलगुंदी,बांधे,मुंगेर,गोडेल,इतलनार,नेंडेर,सुरजागड,मलंमपाड,मल्लम पहाडी आदि गावे या प्रकल्पमुळे प्रभावित होणार असून यावर सकारात्मक तोडगा काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हंटले.

                 प्रस्तावित ३×१५(४५) दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचे कमी दर्जाचे लोह खनिज/बँडेट हेमटाईट कार्टझाईट (बीएचक्यू) लाभदायक प्रकल्पाच्या उभारणीबाबतच्या प्रस्तावा बाबत पर्यावरण विषयक जनसुनावणी बैठकीत पुढे बोलतांना काँग्रेस नेते कंकडालवार यांनी कंपणीमुळे या भागातील जनतेला होत असलेल्या त्रासाबद्दल कंपनीच्या अधिकाऱ्यांना व प्रशासनाला अवगत करून देत उद्योग विरहित अहेरी विधानसभा क्षेत्रातील सुशिक्षित युवक – युवतींना लोहप्रकल्पात प्राधान्यक्रमाणे कायम रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करावे तसेच ह्या विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेत या भागात रस्ते,नाली,पुल,पिण्याचे पाणी,रुग्णवाहिका,विज,आरोग्य सेवा,आदि मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.
          
              या पर्यावरण विषयक जनसूनवानीला जिल्हाधिकारी अविश्यात पांडा,गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान,माजी खासदार अशोक नेते,आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार मिलिंद नरोटे, माजी आमदार देवराव होळी, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विश्वजीत कोवासे, आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी,काँग्रेस नेते नंदूभाऊ मट्टामी,पदाधिकारी कार्यकर्ते सर्व विभागाचे कर्मचारी व सुनावणी करता बाधित क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here