अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत नागेपल्ली अंतर्गत येत असलेल्या मोद्दूमाडगू येथील एम.पी.एल.मोदुमोडगू क्रिकेट क्लब तर्फे आयोजित भव्य टेनिस बॉल 30 यार्ड सर्कल रात्रकालीन सामन्याचे आयोजित केले आहे.या स्पर्धेचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली.
एम.पी.एल मोदुमोडगू क्रिकेट क्लब तर्फे आयोजित भव्य टेनिस बॉल 30 यार्ड सर्कल रात्रकालीन सामन्यासाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व हनुमंतू मडावी आदिवासी कॉग्रेस सेल जिल्हा अध्यक्ष यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक लक्ष्मण कोडापे सरपंच नागेपल्ली तथा रमेश शानगोंडावार उपसरपंच नागेपल्ली कडून तसेच तृतीय पारितोषिक सौ.बेबीताई मंडल सदस्य ग्रामपंचायत नागेपल्ली,सौ.करिष्मा आत्राम सदस्य ग्रामपंचायत नागेपल्ली यांचे कडून देण्यात येत आहे.या कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी हे होते.
यावेळी रमेश शानगोंडावार उपसरपंच नागेपल्ली,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,बेबीताई मंडल सदस्य ग्रामपंचायत नागेपल्ली,सौ.करिष्मा आत्राम सदस्य ग्रा.प.नागेपल्ली,नारायण सिडाम पेसा अध्यक्ष मोदूमोडगू,प्रेमीला मिस्त्री सदस्य पेसा,मनान शेख,मल्लेश गुरुडवार,रघु येलकरी,किशोर भाऊ दुर्गे,हैदरखान पठाण,मिलिंद खोंड पत्रकार, प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील क्रीडा प्रेमी तसेच स्थानिक कार्यकर्ते,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पाच कमिटी व आयोजक मंडळ उपस्थित होते