Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून कर्करोग रुग्णाला आर्थिक मदत

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून कर्करोग रुग्णाला आर्थिक मदत

70
0

अहेरी : शहरातील इंदिरानगर बेघर कॉलनी येथील सुरेश आलाम यांना कर्करोग ग्रासले होते.घरची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी अडचण भासत होते.कर्करोग रुग्ण सुरेश आलाम यांना अर्धवट उपचार करून नागपूर रुग्णालयातुन परतावे लागले.आत्राम कुटुंबातील नातेवाईकांनी अहेरी जनसंपर्क कार्यालय येथे आपली अडचण आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना सांगण्यात आली होते.आत्राम कुटुंबियांचे अडचण बघून गोर गरीब जनतेचे आधार – अजयभाऊ कंकडालवार यांनी कर्करोग रुग्ण सुरेश आत्राम यांना पुढील उपचार औषधीसाठी अजयभाऊ यांच्या कडून आर्थिक मदत करण्यात आली.पुढील उपचारा दरम्यान काही अडचण भासल्यास संपर्क करण्यात यावी म्हणून आत्राम कुटुंबातील नातेवाईकांना सांगितले.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सभापती सुरेखा आलम,माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके, नगर सेवक प्रशांत गोडशेलवार, नरेश गर्गम,लक्ष्मण आत्राम,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here