



एटापल्ली : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती मा.श्री.अजय कंकडालवार यांच्या वाढदिवसानिमित्त एटापल्ली तालुक्यात सामाजिक जाणीवेतून पुस्तक, लेखन साहित्य आणि फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.हे उपक्रम ग्रामीण रुग्णालय एटापल्ली, जिल्हा परिषद शाळा मरपल्ली व जि.प. शाळा हालेवारा येथे राबविण्यात आले.कार्यक्रमाच्या वेळी प्रज्वल नागूलवार,नगरसेवक निजान पेंदाम,सूरज लेकामी, सुरेंद्र मडावी,उपसरपंच संध्या कन्नलवार, सुशील कन्नलवार, सैन्यू मठामी,आशिष गोराडवार, बबली लेकामी व मडावी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.या उपक्रमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि फळांचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.