


गडचिरोली : काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले.आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवसाला सामाजिक बांधिलकी जोपासत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने रक्तदान शिबिरात भाग घेतले.