Home राजकीय आदिवासी विकास महामंडळाकडे थकीत असलेली कोट्यवधी रु.बाजार समित्यांना मिळवून द्या : अजय...

आदिवासी विकास महामंडळाकडे थकीत असलेली कोट्यवधी रु.बाजार समित्यांना मिळवून द्या : अजय कंकडालवार

62
0

गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाकडे मागील अनेक वर्षांपासून अहेरी व सिरोंचा या दोन्ही बाजार समित्यांची कोट्यवधी रुपये थकीत असल्याने बाजार समित्यांचे प्रशासन चालविणे कठीण जात असून या दोन्ही बाजार समित्यांना उत्पन्नाचे साधनच नसल्याने बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांचे पगार करने ही जड जात असल्याने आदिवासी विकास महामंडळाकडे थकीत असलेली बाजार समित्यांचे हक्काचे रक्कम मिळवून देण्याची मागणी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.ते अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाकडून आयोजित 54 वी वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ही मागणी केली आहे.शिर्डी येथे राज्यस्तरीय सर्वसाधारण सभेला सभापती प्रविणकुमार नाहाटा,उपसभापती संतोष सोमवंशी ,कार्यकारी संचालक किशोर कुलकर्णी सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.या सभेत अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना आयोजकांनी ग्रामीण भागातील बाजार समित्यांमधील अडी अडचणी व समस्यां मांडण्याचे संधी दिले.या संधीचे सोने करित त्यांनी पुढे बोलतांना,उघड्यावरील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळ दरवर्षी ताडपत्रीचे खरेदी करीत असतात.आविमकडून ताडपत्रीचे 40 -40 लाखाचे बिल मात्र बाजार समित्यांना पाठवित असतात. अन हे अदा करण्याचे काम बाजार समित्या करीत आहे.म्हणून आता येत्या हंगामापासून ताडपत्री खरेदी करण्याचे हक्क महामंडळा ऐवजी बाजार समित्यांना देण्यात यावी तसेच मोहफुल खरेदी करण्याचे अधिकार ही बाजार समित्यांना देण्याची मागणी ही केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here