Home राजकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काँग्रेसची रणनीती बैठक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काँग्रेसची रणनीती बैठक

24
0

अहेरी : गडचिरोली जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून आज अहेरी येथे रणनीती बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यात काँग्रेसची संघटना मजबूत करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकहाती सत्ता स्थापनेसाठी पक्षनेते कटिबद्ध आहेत.

या बैठकीत माजी मंत्री व आमदार मा. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अहेरी विधानसभा क्षेत्र निरीक्षक व वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक मा.संतोषभाऊ रावत यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा होणार आहे. खासदार डॉ.नामदेवराव किरसान आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांची उपस्थितीही लाभणार आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी जि.प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार हे जिल्ह्यात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी सातत्याने परिश्रम घेत असून,या बैठकीत त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.सर्व इच्छुक उमेदवार, पदाधिकारी,कार्यकर्ते,आजी-माजी जि.प.व पंचायत समिती सदस्य,ग्रामपंचायत सदस्य,बचत गट सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेसचे सचिव हणमंतु मडावी यांनी केले आहे.

📍 स्थळ : इंडियन पॅलेस फंक्शन हॉल, भुजंगरावपेटा, अहेरी
🕚 वेळ : सकाळी 11 वाजता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here