अहेरी : तालुक्यातील रसपल्ली येथील राजाराम दुर्गम व राजेश गंगाराम कोटा रा पत्तीगाव यांनी दसरा निमित्याने अहेरीला येऊन परत स्वगावी जात असताना मोसम या गावातील करण सीताराम अर्का व हणमंतु लालु पुंगाटी दोन युवक अहेरी कडे येत होते.मोसम येते एकमेकांच्या दुचाकीची अपघात झाल्याने यात राजाराम आणि राजेश यांच्या डोक्याला व छातीला जबर मार लागल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याचे बाब अजयभाऊ कंकडालवार यांचे खंदे समर्थक,माजी सभापती भास्कर तलांडे,श्रीनिवास राऊत यांनी ब्रम्हनध्वनीद्वारे काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती दिली.
यावेळी कंकडालवार यांनी क्षणाचेही विलंब न करता घटनास्थळी तात्काळ त्याच्या स्वतःची रुग्णवाहिका पाठवून रुग्णांना तात्काळ अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.
तसेच रुग्ण रुग्णालयात येण्या अगोदरच कंकडालवार यांनी स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार व कार्तिक तोगम यांना रुग्णालयात पाठवून रुग्णाची काळजी घेण्यासाठी सांगितले.तसेच कंकडालवार यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.कन्ना मडावी यांना मोबाईल वरून अपघातग्रस्त युवकांवर योग्य उपचार करण्यासाठी त्यांना सांगितले.
यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,प्रकाश दुर्गे सामजिक कार्यकर्ता,कुमार गुरणुले,रितेश मोहर्ले,प्रमोद गोडसेलवार आदी उपस्थित होते.