सिरोंचा :तालुक्यातील रंगधामपेठा येथील लक्ष्मी चीनन्ना लाटकरी नातीनची त्याबेत खराब असल्याने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी काही दिवसा अगोदर आणले होते नातीन चे उपचार चालू असताना लक्ष्मी चीनन्ना लाटकरी ( वय 65 वर्षे ) हिला अचानक छातीत दुखणे वाढल्याने प्रकृती खूप बिघडल्याने तिचे उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले होते.मृतक लाटकरी यांचे कुटुंब अंत्यत गरीब असल्याने त्यांना मृतकाचे मृतदेह स्व:गावी घेऊन जाण्यासाठी आर्थिक अडचण भासत होती.सदर माहिती येथील काँग्रेसचे पदाधिकारी बानय्या जनगम यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना देताच त्यांनी तात्काळ मृतकाचे मृतदेह स्व:गावी रंगधामपेठा येथे नेण्यासाठी कंकडालवारांनी खाजगी चार चाकी वाहन उपलब्ध करून दिले.
यावेळी लाटकरी कुटुंबातील सर्व सदस्यांनी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे आभार मानले.यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, शंकर येलूरकर, कार्तिक तोगम माजी उपसरपंच,तसेच काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित राहून मृतकाचे कुटुंबाला सहकार्य केले.
Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी करून दिली मृतदेह स्व:गावी नेण्यासाठी खाजगी वाहनाची...