Home सिरोंचा सिरोंचा तालुक्यातील मेडराम येथील प्रतिष्टीत नागरिक वेंकन्ना तल्ला यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित...

सिरोंचा तालुक्यातील मेडराम येथील प्रतिष्टीत नागरिक वेंकन्ना तल्ला यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)गटात जाहीर प्रवेश

10
0

सिरोंचा- गडचिरोली  जिल्ह्यातील सिरोंचा  तालुक्यातील रामांजपूर येथील राजराजेश्वरी फंक्शन हॉल मध्ये अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री मा. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारा व सर्वसमावेशक भूमिकेवर विश्वास ठेवून सिरोंचा तालुक्यातील मेडराम येथील प्रतिष्टीत नागरिक तल्ला वेंकन्ना यांच्या जाहीर पक्षप्रवेश पार पडला.

आमदार या नात्याने मा.डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी नव्याने पक्षात सामील झालेल्या मेडराम येथील प्रतिष्टीत नागरिक वेंकन्ना तल्ला यांना राष्ट्रवादी परिवारात मनःपूर्वक स्वागत केले.या नवप्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच पक्षाची ध्येयधोरणे आणि विचारधारा याबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले.

तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षविस्ताराच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे सर्वांना आवाहन केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवा नेता हर्षवर्धन बाबा आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार )पक्षाचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, नगरसेवक सतीश भोगे, राष्ट्रवादीचे बानय्या जनगाम, नगरसेवक जगदीश रालाबंडीवार, नगरसेवक सतीश राचारलावार,सिरोंचा शहर अध्यक्ष रवी सुलतान,राष्ट्रवादी महिला अध्यक्ष वेंकटलक्ष्मी अरवेल्ली,नपं सिरोंचाचे नगरसेविका सपना तोकाला,विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,कार्यकारी अध्यक्ष मदनय्या मादेशी, तालुका उपाध्यक्ष कोंडाय्या कटकू, सेवादल अध्यक्ष ओमप्रकाश ताटीकोंडावार, रामन्ना कडार्ला, बापू रंगूवार,लोकमत पत्रकर नागभूषणम चकिनारपुवार, सरपंच अजय आत्राम, सूरज गावडे, लक्ष्मण गावडेसह सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार )गटाचे माजी जिप व पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी, स्थानिक नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here