Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मेडपल्ली ग्रामपंचायतला भेट व विविध विषयांवार चर्चा

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मेडपल्ली ग्रामपंचायतला भेट व विविध विषयांवार चर्चा

69
0

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत मेडपल्ली येते लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी मेडपल्ली ग्रामपंचायत व गावातील नागरिकांची भेट घेऊन नागरिकांशी संवाद साधत नाली,रस्ते,आरोग्य सुविधा,शिक्षण व गावांतील विविध विषयांवार चर्चा करण्यात आली.चर्चा दरम्यान मेडपल्ली येथील नागरिकांनी आमच्या समस्या दूर करा म्हणून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडे चर्चा दरम्यान सांगितले.माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी आपल्या समस्या लवकरत लवकर दूर करण्यात येईल असे आश्वासन दिले.त्यावेळी गावातील समस्त नागरिकांनी अजयभाऊंची आभार म्हणाले.

यावेळी मेडपल्ली ग्रामपंचायत सरपंच निलेश वेलादी,पेरमिली ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रमोद आत्राम,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम,अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,राकेश सडमेक,प्रमोद गोडशेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here