Home अहेरी इंदाराम येथे काकड आरती व तुळशी विवाह कार्यक्रम उत्साहात संपन्न :हनुमान मंदिर...

इंदाराम येथे काकड आरती व तुळशी विवाह कार्यक्रम उत्साहात संपन्न :हनुमान मंदिर येथे कंकडालवार परिवाराकडून महाप्रसादाचे आयोजन

12
0

अहेरी : दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गुरुमाऊली भजन मंडळ व काकड आरती सेवा समिती इंदारामकडून काकड आरती व तुळशी विवाहाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी गावकऱ्यांनी व भक्तांनी मिळून भक्तिमय वातावरणात पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी देवीची ढोल ताश्याच्या गजरात भव्य रैली काढण्यात आली.कार्तिक पौर्णिमा निमित्त बुधवारला कार्तिक पौर्णिमा,त्रिपुरारी पौर्णिमा आणि देव दीपावली होती.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेसचे नेत्या,माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडले.

इंदाराम येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात काकड आरती व तुळशी विवाह कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झालं.त्यावेळी कंकडालवार दाम्पत्यांनी पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी व भगवान हनुमान यांची विधिवात पूजा करून दर्शन घेतले आहे.कार्यक्रम ठिकाणी कंकडालवार परिवाराकडून महाप्रसाद कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.या महाप्रसादाचे अनेक नागरिकांनी व भाविकांनी आस्वाद घेतल्या,एकंदरीत कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,ग्रामपंचायत विद्यमान सदस्य गुलाबराव सोयम,मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास कोत्तावडलावर,उपाध्यक्ष वसंत मेश्राम,सहसचिव साई गोमासे,अविष दुर्गे,रोहीत,कोत्तावडलावर,सिनू रेपाखवार,मिथुन दुर्गे,नरेंद्र दुर्गे,प्रमोद सदनपवार,नागेश औतकर यांच्यासह स्थानिक समस्त नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here