सिरोंचा : तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित आढावा बैठकित काँग्रेसचे महासचिव अजयभाऊ कंकडालवार यांनी काँग्रेस हे कधीही न संपणार पक्ष असून या पक्षाला संपविन्याची भाषा केलेल्यानी स्वतः संपल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
सिरोंचा येथे माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचा आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा.श्री.हणमंतू मडावी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली.
बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकांसह (स्थानिक स्वराज संस्थांच्या) निवडणुकांबाबत संघटन बळकट करण्यासाठी कंकडालवारांनी मार्गदर्शन केले.आणि येथील उपस्थित काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.सर्वप्रथम अजयभाऊ कंकडालवार सह उपस्थित मान्यवरांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माजी आमदार पेंटारामा तलंडी,सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जावजी,काँग्रेसनेते व संचालक मल्लिकार्जुन आकुला, सिरोंचाचे माजी उपसरपंच रवी सल्लम, सरपंच रमेश तैनेनी,माजी सरपंच सल्लावर मॅडम,सरपंच कारे मडावी,नगरसेवक मारुती गणपूरपु,संचालक नागराजू इंगली,पापाय्या राईल्ला, गुडूरी राजू, सरिता ताईनेनी, पानते मल्लय्या,माजी नगरसेवक विजय तोकला,सोशल मीडिया संपत गोगूला,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी सदस्य अजय नैताम,राजू दुर्गेश,राकेश सडमेक,स्वप्नील मडावी,राकेश सडमेक,सदस्य महेंद्र दुर्गम,राकेश चुक्कावार यांच्या सह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





