Home सामाजिक माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते सी.सी.रोड कामांचे भूमिपूजन

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते सी.सी.रोड कामांचे भूमिपूजन

85
0

अहेरी : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय आवलमरी अतंर्गत येते लंकाचेन येथील शंकर पोच्या दुर्गे यांच्या घरापासून चंदृ भगवान कुलमेते यांच्या घरापर्यंत सिमेंट कँक्रेट रस्ता 195 मी. 20 लक्ष व बुधय्या करपेत ते बापू करपेत यांच्या घरापर्यंत सिमेंट कँक्रेट रस्ता 190 मी. 20 लक्ष तसेच शामराव कुळमेते ते मदनय्या कुमराम यांच्या घरापर्यंत सिमेंट कँक्रेट रस्ता 195 मी. 20 लक्ष असे एकूण 60 लक्ष रुपयाचे काम मंजूर झाले असून सदर रस्ता बांधकामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.पावसाळयात रस्ता चिखल होऊन नागरिकांच्या आरोग्यवर परिणम होत असतो व चिखलातून ये-जा करावा लागत होतो त्यामुळे रस्ता बांधकाम आवश्यक असल्याने आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे गावातील नागरीकांनी मागणी केली असता.सदर रस्ता मंजूर करण्यात आली असून आज भूमिपूजन कार्यक्रम सम्पन्न झाला.असून नागरिकांना सोईचे होईल.

सदर रस्ता भूमिपूजनाच्या वेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नारपंचयातचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,सरपंच सौ.सुनंदा कोडपे,उपसरपंच चिरंजीव चिलवेलवार,माजी सरपंच मारोती मडावी,ग्रा.प.सदस्य विमला छटारे ,ग्रा.प.सदस्य कमलाबाई आत्राम,नामदेव मडावी,नानाजी मुरमाळे,बाबुराव बट्टी,पोचम मडावी,वैकंना कोडपे,पोलीस पाटील मनोहर पांगळे, साबय्या कुळमेते,चंदु कुळमेते,रमेश सडाम,महेश पानेम,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here