अहेरी : प्रणहिता–अहेरी, अहेरी–महागाव आणि अहेरी–देवलमारी या महत्त्वाच्या मार्गांवरील अपूर्ण रस्ते कामांबाबत नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.आज आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मा.रव्वा साहेब यांची माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व स्थानिक नागरिक प्रतिनिधींनी भेट घेऊन रस्ते कामांबाबत चर्चा करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले की, विभागाकडून पूर्वी लेखी आश्वासन देण्यात आले होते,मात्र त्यानंतरही संबंधित रस्त्यांचे काम अद्याप सुरू झालेले नाही.त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
निवेदन देताना अजय कंकडालवार यांनी इशारा दिला की,जर पुढील ७ दिवसांत रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्यात आली नाहीत.तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आलापल्ली कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याची काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी संबंधित विभागांना इशारा देण्यात आली आहे.
स्थानिकांचा आरोप आहे की,या रस्त्यांमुळे अनेक गावांचा संपर्क तुटत असून शेतकरी,विद्यार्थी आणि रुग्णवाहिका वाहतुकीला मोठा फटका बसत आहे.आता शासन आणि विभागाने तातडीने कारवाई करून कामे सुरू करावीत,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





