Home अहेरी भामरागड ते आरेवाडा रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे

भामरागड ते आरेवाडा रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे

25
0

अहेरी : विधानसभा क्षेत्रांतर्गत असलेल्या भामरागड तालुक्यातील भामरागड ते आरेवाडा रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असून पहिल्याच पावसात पूल वाहून गेले.याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसनेते  व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.

भामरागड तालुक्यात अनेक विकास कामे होत आहेत.छोट्या मोठ्या नाल्यावर नव्याने पूल बांधण्यात येत आहे.मात्र भामरागड ते आरेवाडा मार्गावर असलेल्या एका नाल्यावर काही महिन्यापूर्वी बांधण्यात आले.सदर पूल पहिलाच पावसात वाहून गेल्याचे दिसत आहे.सदर पूला लगतचा मलबा पहिल्याच पावसात खचलेला आहे त्यामुळे या पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे ठरले आहे.

पहिल्याच पावसात पुलाची अशी दयनीय अवस्था झाल्याने सदर पुलाचे काम कितपत चांगले आहे सदर कामाचा दर्जा हा आता दिसून येत आहे. सदर बांधकामाची चौकशी करून कंत्राटदारावर योग्य कारवाई करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here