सिरोंचा : तालुक्यातील नारायणपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य कार्यकर्त्यांनी पक्ष प्रणालीवर नाराजी व्यक्त करित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले.
नारायणपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी मागील अनेक वर्षांपासून येथील सत्यम अंबाला,भास्कर मुलगुरी,नागेश कोय्यला, दिनेश कोय्यला यांनी प्रामाणिकपणे करित होते.परंतु गावात सुरु असलेल्या अतंर्गत गटबाजीला कंटाळून रा.कॉ. कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे हात धरले.यामुळे नारायणपूर येथे काँग्रेस पक्षाची ताकद नक्कीच वाढणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव हणमंतू मडावी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखल करून रा.कॉ.कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केले.
काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची काँग्रेस पक्षाचे तालूका अध्यक्ष सतीश जवाजी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आकूला मल्लिकार्जुनराव,काँग्रेस नेते व माजी सरपंच रवी सल्लम,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागराजू इंगीली आदींनी पक्षाचे दुपट्टे टाकून पुष्पगुछ देऊन पक्षात स्वागत केले.सिरोंचा तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात काँग्रेस पक्ष हळूहळू मजबूत होतांना दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य कार्यकर्त्यांची काँग्रेस पक्षप्रवेशा दरम्यान काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Home मुख्य बातम्या नारायणपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य कार्यकर्त्यांची काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश…नारायणपूर येथे रा.कॉ.अजित...





