Home गडचिरोली माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी वाहन उपलब्ध...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी वाहन उपलब्ध करून देत केली आर्थिक मदत

150
0

सिरोंचा : तालुक्यातील ग्रामपंचायत झिंगानूर येथील वंगा वंजा गावडे वय 45 वर्षे यांची तब्बेत खराब झाल्याने त्यांना गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करीता भरती करण्यात आली होती.वंगा गावडे यांचे उपचारदरम्यान मरण पावल्याने त्यांचे मृतदेह हे स्वगावी झिंगाणूर ला आणण्यासाठी त्यांच्या घरच्या कुटुंबीयांकडे पैसे नसल्याने त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज होती.सदर माहिती आविस व अजयभाऊ मित्र परिवाराचे युवा कार्यकर्ते शिवराम पुल्लुरी व मिथुन देवगडे यांनी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना कळवताच त्यांनी एका क्षणाचा सुद्धा विलंब न करता मुतकाचे मृतदेह हे झिंगाणूर ला नेण्यासाठी गडचरोली येथील शववाईका बोलेरो वाहन उपलब्ध करून दिली.तसेच मृतकाच्या कुटुंबातील मुलगा धर्मा वंगा गावडे यांना आर्थिक मदतही दिली.

यावेळी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आविस व अजयभाऊ मित्र परिवाराचे माधव कारे मडावी,मिथुन देवगळे,शिवराम पुल्लूरी,मंगेश मामुलकरसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here