सिरोंचा : सिरोंचा माल येथील शाहू नगर प्रांगणात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मिलिंद बहुउद्देशीय संस्था व नालंदा चॅरीटेबल ट्रस्ट सिरोंचा कडून दिनांक 24 व 25 डिसेंबरला दोन दिवसीय फुले,शाहू व आंबेडकर महासम्मेलन व समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आयोजकांकडून दुसऱ्या दिवशी रात्रौला समाज प्रबोधन व महापुरुषांच्या जीवनावर आधारित भीम गीतांचे दुय्यम कव्वाली मुकाबला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.
या दुय्यम कव्वाली मुकाबला कार्यक्रमाचे उदघाटनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जि.प.चे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना आयोजकांकडून सन्मानपूर्वक मानाचे निमंत्रण देण्यात आले होते.
परंतु त्यांच्या अन्य ठिकाणी पूर्व नियोजित कार्यक्रम असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत दुय्यम कव्वाली मुकाबल्याचे उदघाट्न कार्यक्रम अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिनिधि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आकूला मल्लिकार्जुन व माजी उपसरपंच रवी सल्लम यांच्या हस्ते पार पडले.
उदघाटन कार्यक्रमानंतर सिरोंचाचे माजी उपसरपंच व काँग्रेसचे युवा नेते रवी सल्लम यांनी समाज प्रबोधन कार्यक्रमावर आधारित समयोचित मार्गदर्शन केले.
या दुय्यम कव्वाली मुकाबल्याचे उदघाट्न समारंभाला मुख्य अतिथी म्हणून नगरसेवक मारोती गणपूरपूवार,जाफ्राबादचे उपसरपंच गोदारी स्वामी,सामाजिक कार्यकर्ते चिलमूला समय्या,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरध्यक्ष रवी सुलतान,अजयभाऊ कंकडालवार यांचे सोशल मीडिया प्रमुख संपत गोगुला आदि उपस्थित होते.
दोन दिवसीय कार्यक्रमाला तीन राज्यातील बहुजन समुदायाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Home अहेरी सिरोंचा येथील दुय्यम कव्वाली मुकाबल्याचे काँग्रेस नेते कंकडालवार यांचे प्रतिनिधिंद्वारा उदघाटन…फुले,शाहू व...





