Home अहेरी आलापल्लीतील प्रतिष्ठित नागरिक गंगाराम ईस्टाम यांचे निधन; काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांचाकडून...

आलापल्लीतील प्रतिष्ठित नागरिक गंगाराम ईस्टाम यांचे निधन; काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांचाकडून सांत्वन

5
0

आलापल्ली : साई मंदिर आलापल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक गंगाराम ईस्टाम यांचे आज पहाटे सुमारे ४ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेली एक जिव्हाळ्याची व्यक्तीमत्त्व हरपल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

गंगाराम ईस्टाम हे साई मंदिर परिसरातील विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत होते त्यांच्या साधेपणामुळे आणि मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे होते.

दरम्यान स्थानिक कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजय कंकडालवार यांना माहिती देतच ईस्टाम कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

गंगाराम ईस्टाम यांच्या पश्चात कुटुंबीय असा मोठा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज दुपारी स्थानिक स्मशानभूमीत करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,ईस्टाम परिवारास या दुःखातून सावरण्याची हिम्मत देवो अशी कंकडालवारांनी ईश्वरास प्रार्थना केले.

त्यावेळी स्थानिक नागरिक व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here