Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मार्कंडेश्वर देवस्थान महाशिवरात्री यात्रेला भेट

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मार्कंडेश्वर देवस्थान महाशिवरात्री यात्रेला भेट

21
0

मुलचेरा : तालुक्यातील खुदीरामपल्ली येथील नवनिर्मित मार्कंडेश्वर देवस्थान यात्रेला आविसं काँग्रेसनेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा काँगेसच्या आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी यांनी भेट देऊन मनोभावे पूजा अर्चना भगवान मार्कंडेश्वरांचे दर्शन घेतले.

खुदीरामपल्ली येथील नवनिर्मित मार्कंडेश्वर देवस्थान येथील माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी सेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी यांनी महाशिवरात्री निमित्त भेट दिली.मार्कंडेश्वर च्या मूर्तीचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा अर्चना केली.

महाशिवरात्री निमित्त खुदीरामपल्ली येथील मार्कंडेश्वर देवस्थानच्या यात्रेत भक्ती भावाने आलेल्या भक्तगणांशी सवांद साधला.यावेळी त्यांनी मंदीर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.यात्रेत केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थेबद्दल आभार व्यक्त करीत मंदीर व्यवस्थापनाला आर्थिक मदतही केली.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,विजय विस्वास,रविन बैरागी,सुभाष दास,अशोक मदक,हरिपद दास,सुकमार दास,मिथुन बमेन,समीर दास,प्रदीप दास,स्वप्नील मडावी,सचिन पंचार्य,प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील आविसं काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य तसेच गावातील नागरिक – भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here