Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले अपघातग्रस्त मडावी परिवाराला आर्थिक मदत

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले अपघातग्रस्त मडावी परिवाराला आर्थिक मदत

11
0

अहेरी : तालुक्यातील कोडसेपल्ली येथील रहिवाशी महेंद्र बिच्चू मडावी यांची काल टूव्हीलरने जात असतांना अपघात झाले होते.अपघातात महेंद्र मडावी यांना डोक्याला खूपच दुखापत झाले आहे.त्यांचे नातेवाईकांनी तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे भर्ती करण्यात आली.येथील डॉक्टरांनी चंद्रपूर येथे रेपर केले.

मडावी घरचा परिस्थिती अंत्यत हालखीची असल्याने त्यांना रुग्णालय येथे औषध व उपचारासाठी आर्थिक अडचण भासत होती.आज मडावी कुटुंबातील नातेवाईक काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांची आर्थिक अडचण बाबत सांगितले होते.कंकडालवारांनी मडावी कुटुंबाची अडचण पाहत महेंद्र मडावी यांना औषध उपचारासाठी आर्थिक मदत केले.

यावेळी मदत करतांना अजय कंकडालवार सोबत अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी सभापती सुरेखा आलम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी उपसरपंच कार्तिक तोगम,संजय पोरतेट मा.उपसरपंच,मुत्ता पोरतेट,शैलेश कोंडागुर्ला,प्रकाश दुर्गेसह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here