अहेरी टुडे न्युज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी अहेरी ( Aheri )
अहेरी पंचायत समिति अंतर्गत येथ असलेल्या ग्रामपंचायत वेंकटरावपेठा येथिल ग्रामसेविका कु. सुषमा जी. मडावी यांनी बनावट दस्तावेज सादर करून बिलाची उचल केल्याच आरोप अहेरी येथिल सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नामनवार यांनी संवर्ग विकास अधिकारी अहेरी त्यांचे वरिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली तथा पोलिस विभागाला वेळोवेळी लेखि तक्रार देऊन सदर प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी म्हणून तक्रार दिली होती. सदर चौकशीत आपले गैरकारभार उघडकीस येईल या उद्देशाने संबंधित ग्रामसेविकेने सदर दस्तावेज मध्ये तथा मासिक सभा रजिस्टर मध्ये खोडतोड केल्याने पंचायत समितीच्या चौकशी समितीच्या चौकशी दरम्यान आढळून आल्याने तसा अहवाल देखिल समितीने दिला त्यानंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबबत प्रशांत नामनवार यांनी पोलिस विभागाकडे तथा पंचायत समिति कडे तक्रार दाखल केली परंतु सदर तक्रारीवर अद्याप कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने या प्रकरणात २६ एप्रिल २०२३ पर्यंत संबंधित ग्रामसेविकेला निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावे अन्यथा दिनांक ०१ मे २०२३ ला सोमवार सकाळी ११.०० वाजता पासुन अहेरी पंचायत समिति कार्यालया समोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रशांत नामनवार यांनी आपल्या निवेदनातुन दिलेला आहे. तेव्हा सर्वांचे लक्ष या प्रकरणाकडे लागलेले आहे
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नामनवार यांच्या मागण्या
०१) ग्रामसेविका कु. सुषमा जी. मडावी यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावे
०२) अहेरी पंचायत समिति अंतर्गत येणार्या ग्रामपंचायत मध्ये झालेल्या संपुर्ण भ्रष्टाचार प्रकरणात तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाब
०३) अहेरी पंचायत समिति अंतर्गत येणार्या सर्व ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक पद भरणे
०४) अहेरी पंचायत समिति अंतर्गत येणार्या सर्व ग्रामपंचायत मध्ये माहिती अधिकारी कायदा २००५ च्या कलम ४ चि माहिती तत्काळ प्रकटन करणे
०५) माहिती अधिकार कायदा २००५ नुसार विहित मुदतीत माहिती न देणार्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर तत्काळ शिस्त्भंगाची कार्यवाही करणे