अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील आदिवासी अल्पवयीन मुलीवर आलापल्ली येथे झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक केलेल्या आरोपींसोबत या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याची सखोल चौकशी करावी आणि अटक केलेले आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी,अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी मा.अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने महाराष्टाचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली आहे.दहावी उत्तीर्ण करून उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका आदीवासी मुलीचे आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला.ज्या पद्धतीने तिच्यावर अंमली पदार्थाचा प्रयोग करून तिचे सर्वस्व लुटले हा प्रकार निंदणीय आणि काळीमा फासणारा आहे.त्यामुळे या प्रकरणातील आरोपी रोशन गोडसेलवार व निहाल कुंभारे यांच्यासह इतर कोणी असल्यास त्यांनाही हुडकून काढून कठोर शिक्षा करावी,अशी मागणी कंकडालवार यांनी केली आहे.जिल्ह्यातील आदिवासी मुलींवर अत्याचाराचे कृत्य सातत्याने घडत आहेत ही बाब अतिशय गंभीर असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून. पोलिस विभागाने अशा अमानवीय कृत्य करणाऱ्या दोन्ही दोषींवर विविध कलमान्वये गुन्हा नोंद केले असुन फाशीची शिक्षा द्यावी,गोरगरीब आदीवासी मुलींच्या असहायतेचाल गैरफायदा घेऊन त्यांचे अशा पद्धतीने शोषण करण्याची हिंमत यापुढे कोणीही करू नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणीही निवेदनातून त्यांनी केली.असुन यावेळी मा.जिल्हाधिकारी साहेब मा.पोलीस अधीक्षक साहेब,व मा.पोलीस निरीक्षक साहेब यांना माहितीस तथा उचित कार्यवाहीस निवेदन दिली आहे.
निवेदन देताना अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार सहित अहेरी पंचायत समिती माजी सभापती भास्कर तलांडे,अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्ष कु.रोजाताई करपेत,उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,विलास सिडाम नगरसेवक,महेश बाकेवार नगरसेवक,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक,जोती सड़मेक,नगरसेविका,मीनाताई ओंडरे बालकल्याण सभापती नगरपंचायत अहेरी,नौरास शेख बादकाम सभापती नगरपंचायत अहेरी,सुरेखा गोडसेलवार नगरसेविका,विलास गलबले नगरसेवक,माजी जिल्हा परिषद सदस्य अजयभाऊ नैताम,सुरेखा आलाम माजी सभापती प.स.अहेरी,माजी जिल्हा परिषद सदस्य कु.सुनीता कुसनाके,वांगेपलीचे सरपंच दिलीप मडावी,सायलू मडावी सरपंच खमनचेरू,वर्षा पेंदाम सरपंच इंदाराम,गुलाबराव सोयाम माजी सरपंच इंदाराम,अशोक येलमुले माजी उपसरपंच किस्टापुर,राजेश दुर्गे ग्रा.प.सदस्य महागाव,श्याम ओंडरे,सलीम शेख,राजकुमार गुरनुले,गजानन सडमेक,राकेश सडमेकसह आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते