अहेरी टुडे न्युज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी सिरोंचा ( Sironcha )
सिरोंचा : तालुक्यातील अतिदुर्गम भाग असून या तालुक्यातील 114 गावे आहे. रोडवरील 20 ते 30 गावांना बस जात असून जवळ पास 70-90 गावाचे लोक अद्याप पर्यंत बस गेलेले नाही सिरोंचा तालुक्यातील उच्च शिक्षण करिता खेडे गावातील विध्यार्थी जास्त येत असतात. सिरोंचा येथे बस आगार नसून सिरोंचा करिता दोन ते तीन बसेस दिल्याने तालुक्यातील विद्यार्थींना आणि तालुका कार्यालय येथे कामा निमित्त येथ असलेल्या नागरिकांना खूप अडचण होत आहे. सिरोंचा तालुका महाराष्ट्र राज्याचा व छात्तीसगड, तेलंगणा राज्याला लागून आहे तेथील राज्य परिवहन मंडळाचे बसेस सिरोंचा येते येतात. परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे बसेस येथे सिरोंचा येत नाहीत असे खेदाणे म्हणावे लागेल तरी सिरोंचा येथे आंतरराज्यीय बस आगार स्थानक मंजूर केले तर तालुक्यातील सर्व गावांना सोयसुविधा होणार. सिरोंचा तालुक्यातील लवकरात लवकर बस आगार बसस्थानक येथे लोकसेवा सुविधा उपलब्ध करण्यात यावी म्हणून सुरज दुदीवार यांनी सिरोंचाचे तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केले आहे. यावेळी राम रंगुवार, विशाल रंगुवार, सुमन जक्कुला व इतर नागरिक उपस्थित होते