Home अहेरी दोषींवर दडात्मक कारवाई करा : सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार

दोषींवर दडात्मक कारवाई करा : सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार

85
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी अहेरी

आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या घोट वनपरिक्षेत्रातील जैवविविधता उद्यानातून अवैधरित्या मुरूम उत्खनन प्रकरणी दोन वनरक्षक,वनपाल तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.यामुळे वनविभाग प्रशासनात एकच खळबळ निर्माण झाली होती.मात्र या सर्व प्रकाराला मुकसंमती देणारे वरिष्ठ अधिकारी मोकाटच राहिल्याने याचे पडसाद थेट विधिमंडळात उमटले होते.त्यावेळी वनमंत्र्यांनी चौकशी समिती गठित करुन संबंधित दोषींवर दडात्मक कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र दीड महिन्याचा कालावधी लोटूनही या प्रकरणात कोणतीही प्रगती न झाल्याने सदर प्रकरण थंडबस्त्यात पडले काय?असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. यासंदर्भात आलापल्ली वनविभागाच्या वरिष्ठांनी संबंधित समितीद्वारे चौकशी युद्धस्तरावर असल्याची माहिती दिली आहे.घोट बिटामध्ये नोव्हेंबर 2022 पर्यंत राखीव वन जैवविविधता उद्यानात एका कंत्राटदाराच्या नावाने वनाधिकारी, वनकर्मचा-यांनी स्वत: हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन करुन या मुरुमाचा वापर आगार डेपो घोट व इतर रस्ता बांधकामात करण्यात आला होता. अवैध मुरुम उत्खननात अनेक झाडे तसेच वनसंपदाही नष्ट करण्यात आली होती. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी मुख्य वनसंरक्षकाकडे तक्रार दाखल करीत संबंधितावर कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याअंती या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारीसह चार कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र या प्रकरणी केवळ कनिष्ठ कर्मचा-यांवर कारवाई करीत या संपूर्ण प्रकाराला मुकसंमती देणा-या वरिष्ठ अधिका-यांना अभय देण्यात आल्याने कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.ताटीकोंडावार यांनी शासन स्तरावरही याचा पाठपुरावा केल्याने आ.रामदास आंबटकर यांनी विधिमंडळात सदर मुद्दा उपस्थित करीत वनमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.याप्रसंगी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वरिष्ठ वनाधिका-यांमार्फत चौकशी समिती गठित करुन येत्या तीन महिन्यात संबंधित दोषींवर दंडात्मक शिक्षा प्रस्तावित करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान या प्रकरणाला एक महिन्याचा कालावधी लोटूनही वरिष्ठांवर कोणतीही कारवाई न झाल्याने प्रकरण थंडबस्त्यात तर गेले नाही ना? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. सदर प्रकरणात वरिष्ठ वनाधिका-यांवर तत्काळ कारवाई न झाल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही सामाजिक कार्यकर्ते ताटीकोंडावार यांनी दिला आहे.

( बॉक्ससाठी )

गठित समितीद्वारे चौकशी सुरुस दर प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिका-यासह चार वनकर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वनमंत्र्यांच्या आदेशान्वये एसीएफ देवगडे यांच्या नेतृत्वात गठित समितीद्वारे सदर प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. त्यांचा अंतिम अहवाल प्राप्त होताच वरिष्ठांच्या आदेशान्वये पुढील कारवाई करण्यात येईल.राहूल टोलिया, उपवनसंरक्षक, आलापल्ली वनविभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here