Home अहेरी वीज पडून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक लाभ : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार...

वीज पडून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक लाभ : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या पाठपुराव्याला यश

91
0

अहेरी : मेडपल्ली साजा अंतर्गत येत असलेल्या सकीनगट्टा येथील नामे पोचा वंगा तलांडी,दामा कारे गावडे,रमेश पंजा आत्राम यांच्या स्वतःच्या मालकीचे बैल व गाई दि.26.7.2023 ला जंगलात चराई साठी गेले अस्ता सकाळी 7.30 वा.श्री.पारलू चुकू तलांडी यांच्या शेतात मोहाच्या झाडाखाली अचानक वीज पडून सदर बैल व गाई ठार झाले असता मालकानी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना निवेदन देऊन शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विनंती केली असता.माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी निवेदनाची दखल घेऊन मा.तहसीलदार साहेबांना सदर नुकसान ग्रस्त लाभार्त्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी विनंती केली असता.मा.तहसीलदार साहेबांनी संबधीत महसूल कर्मचाऱ्यांना अहवाल मागून नुकसानग्रस्त लाभार्त्यांना त्वरित आर्थिक मदत मिळवून दिले असल्याने सदर लाभार्त्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती मा.अजयभाऊ कंकडालवार यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here