Home मुख्य बातम्या राजाराम येते स्थायी ग्रामसेवकांची नियुक्ती करा : अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयाला कुलुप ठोकणार...

राजाराम येते स्थायी ग्रामसेवकांची नियुक्ती करा : अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयाला कुलुप ठोकणार राजाराम गाववसीयच्या इशारा

81
0

गडचिरोली : अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत कार्यालय राजाराम येथे गेल्या दोन वर्षापासून स्थायी ग्रामसेवक नसून ग्राम पंचायत कार्यालय पल्ले येथिल ग्रामसेवक श्री पी.झाडे यांच्याकडे अतिरिक्त प्रभार म्हणून राजाराम येथे नियुक्त करण्यात आली आहे.मात्र पल्ले व राजाराम हे अंतर खुप लांब ची असून सदर ग्रामसेवक राजाराम येते आठवड्यातून एक-दोनदा येत असतात व जास्त वेळ देत नसतात,तसेच राजाराम ग्राम पंचायत येते सरपंच व सदस्य यांच्या कालावधी संपले असून पंचायत समितीमधून प्रशासक निवड केली असून ते सुद्धा अनुउपस्थिती असतात त्यामुळे नागरिक विविध दाखले घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.तसेच गावातील विविध विकास कामे किंवा विविध योजनेचे माहिती मिळत नसून गावातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.राजाराम ग्राम पंचायत लोकसंख्यानी मोठी आहे.त्यामुळे ग्राम पंचायत राजाराम येथे स्थायी ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा दिनांक 7/8/2023 ला राजाराम ग्राम पंचायतीला कुलूप,ठोकण्यात येईल.अशी इशारा गावकर्यानी अहेरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या कडे निवेदन देवून केली.याबाबत
मा.उमुख्यकार्यकारी अधिकारी साहेब (पंचायत विभाग गड) व मा. मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब. जि.प.गडचिरोली यांना प्रतिलिपि पाठवून माहिती दिली आहे.

निवेदन देताना अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी उपसरपंच संजय पोरतेट,पेसा अध्यक्ष दिपक अर्का,करण आलाम,पाटील.मूत्ता पोरतेट,मुन्ना वेलादी,संतोष दुर्गे,तिरुपती दुर्गे,हनमतु गोंगले,नामदेव दुर्गेसह आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here