“दसरा”मंगळवार 24 ऑक्टोबर 2023 रोजी दसरा साजरा केला जाईल.तसेच सद्दूला बातकाम्मा 22 तारीखेला साजरा करतात.दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते.विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याचीच पाने सोने म्हणून का वाटली जातात.
अहेरी नगरपंचायत येथील कामगार महिलांना आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून अहेरी नगरपंचायत येते सफाई कामगार महिलांना सद्दूला बातकाम्मा तसेच दसरा निमित्त साडी वाटप करण्यात आली आहे.सदर साडी वाटप कार्यक्रम अजयभाऊ जनसंपर्क कार्यालय अहेरी येते संपन्न झालं.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत,उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,वांगेपाल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,बालकल्याण सभापती मीना ओंडरे,नगरसेविका सुरेखा गोडसेलवार,नगरसेविका नौरास शेख,नगरसेवक विलास सिडाम,नगरसेविका ज्योती सडमेक,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नगरसेवक महेश बाकेवार,नगरसेवक विलास गालबाले,नरेश गर्गम,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिलागण मोठ्या संख्येने उपस्थित होते.