Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते इंदाराम येथील धान खरेदीला प्रारंभ

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते इंदाराम येथील धान खरेदीला प्रारंभ

4
0

 

 

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मार्फत खरीप पणन हंगाम 2024-2025 धान खरेदी केंद्राचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते फित कापून धान खरेदी सुरूवात करण्यात आले आहे.

                  अधिकृत केंद्रावराच धान विक्री करा ज्या शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाला आहे.त्यांनी आपल्या धान विक्री करावे आणि ज्यांच्या ऑनलाइन नोंदणी झाले नाही.त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी आणि कोणीही शेतकरी यापासून वंचित राहू नये आणि शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी केले.

                 यावेळी वर्षाताई पेंदाम सरपंच इंदाराम,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,वैभव कंकडालवार उपसरपंच इंदाराम,प्रमोद पेंदाम कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अहेरी,गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य इंदाराम,नामदेव आत्राम माजी सरपंच इंदाराम,वसंत मेश्राम,बाजीराव गावडे,जयराम आत्राम,भिमा पेंदाम,नारायण राऊत व्येंकठरावपेठा,संतोष बुजाळी गुड्डीगुडाम,महेश गडमवार सचिव अहेरी,व्यंकटेश राऊत,प्रफुल सिडाम,नागेश सिडाम,ताशूभैया शेख,प्रमोद गोडसेलवार,लक्ष्मण आत्रामसह गावातील शेतकरी व काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here