अहेरी : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण आलापली येथे दरवर्षी पोचम्मा बोनालू कार्यक्रम आयोजित केली जाते.या वर्षी सुद्धा येथील माता मंदिरात पोचम्मा बोनालू मोठ्या उत्सहात पार पाडले आहे.या पोचम्मा बोनालूला आविसं काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी उपस्थित राहून येल्लाम्मा देवीला विविध पूजा अर्चना – आरती देऊन दर्शन घेतले.
यावेळी दर्शन घेतांना गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे अशी येल्लाम्मा देवीकडे प्रार्थना केली.
यावेळी यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी सरपंच दिलीप गंजिवार, लक्ष्मण गंजिवार, मुत्यालू पोचमपल्लीवार, चंद्रशेखर तोंबरलावर, पांडुरंग गंजिवार, टींकु सल्लाम, व्यंकटी कोकुलावर, अशालू तोगरवर, मोहन चकनाराप, लक्ष्मण चकनाराप, राजेश गडमवार, हनमंतू गंजिवार, मदन भूपेलीवार, नरेंद्र गर्गम, स्वप्नील मडावी, अज्जू भाऊ पठाण, चंद्रकांत बेजलवार, रज्जाक पठाण, पोचाम चर्लावार,अनिल इस्कापे, सचिन पांचार्य, राकेश सडमेक, मोरेश्वर मेडपल्लीवार सह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक – भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.