Home अहेरी तोडसाम व आत्राम परिवाराला काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून ताडपत्री मदत

तोडसाम व आत्राम परिवाराला काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून ताडपत्री मदत

21
0

अहेरी : येथील रहिवासी सुनील तोडसाम व रामदास आत्राम यांच्या घरावर ताडपत्री नसल्याने पावसाळ्यात त्यांना घरात राहणे अडचण होत होती.तोडसाम व आत्राम परिवाराची घरचा परिस्थिती अंत्यत हलकीची असल्यामुळे त्यांना ताडपत्री खरेदी करण्यासाठी या दोन्ही कुटुंबाला खूपच अडचण निर्माण होत आहे.

अहेरी प्रभाग क्रमांक 14 येथील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व परिवहन सेलचे अध्यक्ष ताशू शेख यांनी त्या परिवाराची अडचण बघून दोन्ही परिवारातील मालकांना काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा अहेरी जनसंपर्क कार्यालय येथे कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सांगण्यात आली आहे.

तोडसाम व आत्राम कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बघून त्या दोन्ही परिवाराला ताडपत्री मदत करण्यात आली आहे.त्यावेळी दोन्ही परिवारातील सदस्यांनी कंकडालवार तसेच ताशू शेख यांचे आभार मानले आहे.

यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,कार्तिक तोगम माजी ग्रामपंचायत उपसरपंच मरपल्ली,कुमार गुरनुले,महेश गेडाम,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here