अहेरी : तालुक्यातील वेलगुर टोला येथील नमामि गंगामाता मंदिर असून शिवरात्रीला या ठिकाणी जत्रा भरत असतो.नमामी गंगा माता सेवा समिती यांच्या कडून यावर्षी भगवान शिव यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजित करण्यात आली.आविसं काँग्रेसचे नेते व जि.प.माजी अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व त्यांची आर्धंगीनी काँग्रेसचे नेत्या – अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनलीताई कंकडालवार यांच्या शुभ हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
सर्वप्रथम आगमन होतच सेवा समिती कडून मान्यवरांचे आदिवासी वाद्य घेवून नाचगाणा करत भव्य मिरवणूक काढून स्वागत करण्यात आली.त्यांनंतर गंगा माता मंदिरात जावून पुजा अर्चाना करुन हवन करुन भगवान शिव मूर्तीची कंकडालवार दाम्पत्यांन कडून महाआरती करुन गोपाळ काला करण्यात आली.
यावेळी नमामी गंगामाता सेवासमितीचे पूजारी प.पू.गंगमाता महाराज सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतूजी मडावी,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी पंचायत समिती उपसभापती गिताताई चालुरकर,माजी सरपंच अशोकभाऊ येलमुले,राजारामचे माजी उपसरपंच संजय पोरतेट,रज्जाकभाई पठाण,सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र गर्गम,अहेरी तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ.निसार हकीम,बबलूजी सडमेक,गणेश उपलापवार,राघवभाऊ गौरकर,मुलचेरा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद गोटेवार,आविसं सल्लागार कवडूजी चलावार,अजय पोरतेट,प्रमोद गोडशेलवार,सचिन पांचर्या,चिंटू आत्राम,चिंटू पेंदामसह नमामी गंगामाता सेवा समिती देवस्थान कमिटीचे सदस्य पदाधिकारी व वेलगुर क्षेत्रातील नागरीक तसेच आविसं काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी मल्लेझरी येथील नागामाता व गंगा माता माहिला भजन मंडळ – वेलगुर येथील भजन मंडळी यांच्या शिवभक्ती भजनानी संपुर्ण वातावरण भक्तीमय झाला.यावेळी गंगा माता मंदिर कमिटी तर्फे भव्य महाप्रसादाच्या आयोजन करण्यात आली.
Home अहेरी कंकडालवार दाम्पात्यांन कडून वेलगुर टोला येथे भगवान शिव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न