अहेरी : प्राणहिता पोलीस उपमुख्यालाय ते अहेरी रस्त्याचे मंजूर काम रखाडल्याने आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात रास्तारोको आंदोलन करुन लक्ष वेधल्यानंतर अखेर ७ मार्चपासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.त्यामुळे अजय कंकडालवार यांच्या आंदोलनाला यश आले.
प्राणहिता पोलीस उपमुख्यालाय ते अहेरी रस्त्याचे काम मंजूर झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी कंत्राटदारांने कामाची सुरुवात करून रस्ता खोदून ठेवला होता.त्यामुळे रहदारी करणाऱ्या नागरिकांना खराब रस्त्यावरून दळणवळण करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता.संबधित विभाग व अधिकाऱ्यांना सतत निवेदने देऊन रखडलेले रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली.मात्र रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही.
त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण करण्यास दिरंगाई करणारे कंत्राटदारांला काळ्या यादीत टाकावे व त्यांच्याकडून पुन्हा कामे सुरू असल्यास त्याची संपूर्ण चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी २८ फेब्रुवारी रोजी आंदोलनात केली होती.जनआंदोलनाचा रोष बघून अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले होते. ३१ मार्चच्या आत काम पूर्ण करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनीही कंत्राटदाराकडून लेखी घेतल्यावर आंदोलन मागे घेतले होते.दरम्यान, ७ मार्च रोजी अखेर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.त्यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.अजय कंकडालवार यांचे आभार मानले जात आहेत.
Home मुख्य बातम्या प्राणहिता पोलीस उपमुख्यालाय ते अहेरी कामाला अखेर सुरुवात : अजयभाऊ कंकडालवार यांच्या...