अहेरी : तालुक्यातील किष्ठापूर ( वेल ) येथील जय सेवा व्हाॅलीबाॅल क्लब किष्ठापूर ( वेल ) तर्फे भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केली आहे.सदर व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक आविसं – काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांच्या कडून देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक ग्रामपंचायत किष्ठापूर ( वेल ) यांच्या कडून देण्यात येत आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनुमंतू जी.मडावी होते.
रोहित गलबले ग्रामपंचायत सदस्य वेलगुर,शैलू मडावी ग्रामपंचायत सरपंच खमनचेरू,वामन मडावी,स्वप्नील मडावी,गीताताई चालुरकर पं.स अहेरी माजी उपसभापती,प्रगवानजी आत्राम,महेशजी अर्का पोलीस पाटील,पवनकुमार आत्राम ग्रामपंचायत उपसरपंच किष्टपुर,नरेश मडावी ग्रामपंचायत सदस्य किष्टापुर,हरिष आत्राम,विस्तारी दब्बा, कासीनाथ दब्बा,माजी ग्रामपंचायत सरपंच,सोमाजी आत्राम,निलाबाई मडावी,मायाबाई आत्राम,राधाबाई आत्राम विजय मडावी,पापय्या पोरतेट,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंचसह आदी उपस्थित होते.
Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हाॅलीबाॅल...