Home मुख्य बातम्या पेठा – येल्लाराम रस्ता आणि फुल बांधकाम निकृष्ट दरजेचे – सबंधितअधिकारी व...

पेठा – येल्लाराम रस्ता आणि फुल बांधकाम निकृष्ट दरजेचे – सबंधितअधिकारी व कंत्राटदारांना चौकशी करा

57
0

अहेरी : तालुक्यातील पेठा – येल्लाराम येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत पेठा ते येल्लाराम येथील रस्ता व फुलचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाली आहे.सदर बांधकाम मोक्यावार जाऊन गावकर्यांनी समवेत पाहणी केली असता.

निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून बांधकाम झाल्याचे दिसून आले.कामात अधिकारी व समंधित कंत्राटदार यांनी सगणमताने काम करून भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते.तसेच एक बाजूच्या अफ्रोच बांधकाम कच्चा अवस्थेत असल्याने वाहून गेल्याचे दिसून आले आहे.बांधकाम करतेवेळेस अफ्रोच करण्यात आलेल्या मालात डांबर गिट्टी व इतर साहित्य निकृष्ट दर्जाचे व कामी प्रमाणात वापरून शासनाची दिशाभूल करून बांधकाम पूर्ण झाल्याचे दर्शवून शासनाची दिशाभूल केल्याचे दिसून येत आहे.

सदर बांधकामाची सखोल चौकशी करून संबंधितावार योग्यती कार्यवाही करून उत्तम दर्जाचे बांधकाम करण्यात यावी म्हणून.येथील समस्त गावकर्यांनी आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

यावेळी निवेदन देतांना उपस्थित सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी,आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बनाय्या जनगाम,काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जवाजी,रोजताई करपेत नगरपंचायत नगराध्यक्षा अहेरी,सुनीता कूसनाके माजी जि.प.सदस्या,अजय नैताम माजी जि.प.सदस्य,सुरेखा आलम माजी पंचायत समिती सभापती अहेरी,हरीश गावडे उपसरपंच,अशोक येलमुले माजी सरपंच वेलगुर,स्वप्नील मडावी,सत्यम नीलम,शिवराम पुल्लुरी,आनंद जियाला,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,श्रीनिवास राऊत,शंकर पोरतेत,वनिता वेलादी सरपंच जिमालगट्टा,शांताताई सिडाम सरपंच पेठा,शंकरीताई पोर्तेट सरपंच गोविंदगव,हरीश गावडे उपसरपंच,राजू दुर्गे,महागाव,नरेश गर्गाम,लक्ष्मण बोल्ले,प्रमोद गोडसेलवार,सचिन भाऊ,बसिर्भाऊ, राकेश रेड्डी,अक्षय मडावी,रमाय्याजी मुळकरी,विश्वास भाऊ,कारे सर,येलमुल सर,शेख सर,जियाला सर,सत्यम वेलादी माजी सरपंच देचालीपेठासह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here