Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून मृतक करुणा नेर्ला कुटुंबाला अंत्यविधी कार्यक्रमासाठी आर्थिक...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून मृतक करुणा नेर्ला कुटुंबाला अंत्यविधी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत

19
0

अहेरी : तालुक्यातील कोडसेलगुडम येथील रहिवाशी कु.करुणा नेर्ला यांनी काल घरचा काही अडचणीमुळे रासायनिक औषध  प्राशन केल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला कामलापूर येथील दवाखान्यात दाखल केले होते नंतर तिला उपजिल्हा रुग्णालय अहेरी रेफर केले रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी मृत्यू घोषीत केले

         कोडसेलगुडम येथील युवतीची या दुःखद घटनेची स्थानिक कार्यकर्त्यानी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती दिले होते.

                  विशेष म्हणजे अजय कंकडालवार या घटनेच्या वेळी बाहेर गावी दौऱ्यावर असतांना त्यांनी अहेरी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांना दवाखान्यात पाठवून मृतक युवती नेर्ला कुटुंबाला आर्थिक मदत पाठवून आपल्या सामाजिक बांधलीकीचे परत एकदा परिचय करून दिले.या मदतीबद्दल मृतक युवतीचे कुटुंबानी कंकडालवार यांच्याबद्दल समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here